दिग्विजय सिंहांचे मोदी आणि राठोडांना चॅलेंन्ज

वृत्तसंस्था
रविवार, 27 मे 2018

भाजपचे मंत्री एअर कंडीशन खोल्यांमध्ये जोर-बैठका काढत आहेत. त्यांना माझे चॅलेंन्ज आहे त्यांनी 3000 किमी ची मां नर्मदा परिक्रमा करून दाखवावी. याची हिंमत मोदीजी, राठोडजी, रिजूजी तुमच्यात आहे का? शिवराज सिंह चौहाण यांनीतर हॅलीकॉप्टर मधून नर्मदा परिक्रमा केले आहे."

दिल्ली : सुचना व प्रसारणमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या फिटनेस चॅलेन्ज नंतर प्रत्येक जन एकमेकांना चॅलेंन्ज करू लागले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंन्ज दिले. त्यांनी ते स्विकारले.

आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांना एक वेगळेच फिटनेस चॅलेंन्ज दिल आहे. दिग्विजय सिंह यांनी याविषयी एका ट्विट मध्ये म्हणाले, आज काल फिटनेस चॅलेंन्जची खुप चर्चा सुरू आहे. भाजपचे मंत्री एअर कंडीशन खोल्यांमध्ये जोर-बैठका काढत आहेत. त्यांना माझे चॅलेंन्ज आहे त्यांनी 3000 किमी ची मां नर्मदा परिक्रमा करून दाखवावी. याची हिंमत मोदीजी, राठोडजी, रिजूजी तुमच्यात आहे का? शिवराज सिंह चौहाण यांनीतर हॅलीकॉप्टर मधून नर्मदा परिक्रमा केले आहे."

Web Title: Digvijay Singh's challenge to Modi and Rathore