esakal | बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी गेलेल्या दिग्विजय सिंह यांना...
sakal

बोलून बातमी शोधा

बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी गेलेल्या दिग्विजय सिंह यांना...

- काँग्रेसच्या 22 आमदारांनी केली बंडखोरी. 

बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी गेलेल्या दिग्विजय सिंह यांना...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळुरु : मध्य प्रदेशात मोठी राजकीय उलथापालथ होत आहे. काँग्रेसच्या 22 आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे कमलनाथ सरकारला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर आता या आमदारांना भेटण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह गेले होते. मात्र, त्यांना पोलिसांनी रोखले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिंदे समर्थक 22 आमदारांनी बंडखोरी केली. हे सर्व आमदार मागील 10 दिवसांपासून बंगळुरू येथे एका हॉटेलमध्ये आहेत. त्यांना भेटण्यासाठी दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसचे काही नेते बंगळुरुला पोहचले. जेव्हा दिग्विजय सिंह कर्नाटकातील रमादा हॉटेलजवळ आले तेव्हा त्यांना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या नेत्यांनी हॉटेलसमोरील रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरु केले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे.

आमदारांचा जीव धोक्यात

मध्य प्रदेशमधील राज्यसभेचा उमेदवार मी आहे. 26 तारखेला राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेत मतदान होणार आहे. आमच्या आमदारांना या हॉटेलमध्ये बंदिस्त ठेवण्यात आले आहे. त्यांना आमच्याशी बोलायचे आहे, परंतु त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले. आमदारांचा जीव धोक्यात आहे, असेही ते म्हणाले.

वुहानमध्ये नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण