मोदीजींना काय झाले आहे? गायी, म्हशींचेही आधार कार्ड करत आहेत : दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर होणारी प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राण्यांना आधार कार्डप्रमाणे क्रमांक देण्याचा सरकार विचार करत आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत 'मोदीजींना काय झाले आहे? आता गायी, म्हशींचेही आधारकार्ड देण्यात करत आहेत', असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली - भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर होणारी प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राण्यांना आधार कार्डप्रमाणे क्रमांक देण्याचा सरकार विचार करत आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत 'मोदीजींना काय झाले आहे? आता गायी, म्हशींचेही आधारकार्ड देण्यात करत आहेत', असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर होणारी प्राण्यांची तस्करी संदर्भात अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सरकारने प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आधार प्रमाणे व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. गायी आणि म्हशीच्या कानाजवळ एक बारा आकड्यांचा क्रमांक (युआयडी) लावण्यात येणार आहे. या क्रमांकाच्या आधारे गायीची जात, वय, लिंग, स्थान, उंची, शरीररचना, रंग, विशेष खूण आदी माहिती मिळणार आहे. त्यामुळे गायींच्या तस्करीवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

 

या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी ट्‌विटरद्वारे मोदींवर टीका केली आहे. 'मोदीजींना काय झाले आहे? आता गाय आणि म्हशींचे आधारकार्ड तयार करत आहेत. आता गायी, म्हशींचे आधार कार्ड बनेल आणि ते बनवायला किती खर्च येईल? त्याचे कंत्राटही बहुतेक गोरक्षकांनाच मिळेल? मात्र त्यानंतर प्राणी पाळणाररे गोरक्षकांपासून सुरक्षित राहतील का?', असे काही प्रश्‍न दिग्विजयसिंहांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: Digvijaysingh critic on Narendra Modi