मोदींकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे दिसते: दिग्विजयसिंह

टीम ई सकाळ
शनिवार, 1 जुलै 2017

आजपासून देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या एका ऐतिहासिक सोहळ्यात या कायद्याचा प्रारंभ करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - आजपासून देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या एका ऐतिहासिक सोहळ्यात या कायद्याचा प्रारंभ करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी यापूर्वी जीएसटीला विरोध केला होता. आता त्यांनीच अंमलबजावणी केल्याने त्यांच्याकडे दूरदृष्टाचा अभाव असल्याची टीका दिग्विजयसिंह यांनी केली आहे.

दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे मोदींवर टीका केली आहे. "जीएसटीला तीव्र विरोध करणारे मोदी जीएसटीला पाठिंबा देत असल्याचे पाहून आश्‍चर्य वाटले. यातून त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे दिसते', अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. त्यांनी पुढे लिहिले आहे की, "सर्वाधिक क्‍लिष्ट करप्रणाली मोदीजी गुड ऍण्ड सिंपल टॅक्‍स म्हणत आहेत. देव भारताचे भले करो.' जीएसटीपूर्वीची करप्रणाली अधिक चांगली असल्याचे म्हणत करप्रक्रियेचे सुलभीकरण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी पुढे लिहिले आहे.

"जीएसटी प्रत्यक्षात गुड आणि सिंपल टॅक्‍स आहे. जीएसटीचे श्रेय कोणा एका सरकारचे किंवा एका पक्षाचे नाही, सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिपाक आहे', असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी संदर्भातील कार्यक्रमात बोलताना केले.

Web Title: digvijaysingh india news news delhi narendra modi marathi news sakal news