सेरुला भूखंड घोटाळाप्रकरणी दिलीप परुळेकरांची न्यायालयात हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

या प्रकरणातील तपास कामावेळी संशयित दिलीप परुळेकर यांनी मागील सुनावणीवेळी अनुपस्थित राहण्यासाठी मुभा मागितली होती. ती न्यायालयाने दिली होती.

पणजी : सेरुला कोमुनिदाद भूखंड घोटाळा प्रकरणी म्हापसा न्यायालयातील आरोपपत्रावरील सुनावणीवेळी माजी पर्यटनमंत्री संशयित दिलीप परुळेकर, मीटर मार्टिन्स व आयरिन सिक्वेरा हे तिघांनीही न्यायालयात आज उपस्थिती लावली. 

या तिघांनाही प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या जाचमुचलका व तत्सम रक्कमेच्या एक हमीदार सादर करण्याच्या अटीवर जामीन देत यावरील सुनावणी 4 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. 

मागील सुनावणीवेळी हे तिघेही संशयित अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांना न्यायालयाने पुन्हा एकदा संधी देत ही सुनावणी आज 16 ऑगस्टपर्यंत तहकूब केली होती. या प्रकरणातील तपास कामावेळी संशयित दिलीप परुळेकर यांनी मागील सुनावणीवेळी अनुपस्थित राहण्यासाठी मुभा मागितली होती. ती न्यायालयाने दिली होती. मात्र तत्कालीन कोमुनिदादचे ऍटर्नी पीटर मार्टिन्स व तत्कालिन कोमुनिदाद प्रशासक आयरिन सिक्वेरा हे अनुपस्थित राहिले होते.

Web Title: Dilip Parulekar presents in the court in Cerula plot scam

टॅग्स