दिनेश नाशीपुडी्ंनी केले पाण्याच्या ड्रममध्ये बसून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

बेळगाव : यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यानी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता ते महापालिका कार्यालयात केले. कार्यालयासमोर त्यानी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यानी आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाने महापालिकेतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्याच्या नव्या मंत्रीमंडळात माजी मंत्री सतीश यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी बंगळूर व बेळगाव येथेही आंदोलन केले. समर्थकांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला, बसवर दगडफेकही केली.

 राज्यात अन्यत्रही पडसाद उमटले. जारकीहोळी यांची व त्यांच्या समर्थकांची नाराजी कमी झाली असतानाच आता नगरसेवक नाशीपुडी यांनी आंदोलन केले आहे. यावेळी सतीश समर्थक नगरसेविका जयश्री माळगी व सरला हेरेकर उपस्थित होत्या. सुमारे एक तास नाशीपुडी ड्रममध्ये बसून होते. मंत्रीमंडळ विस्तारात सतीश यांना संधी दिली जावी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यानी दिला आहे. गतवर्षी नाशीपुडी यांनी अनुसूचीत जाती व जमातीच्या कुटुबांची पाणीपट्टी माफ करावी या मागणीसाठी असेच आंदोलन केले होते. महापालिका कार्यालयासमोर पाण्याच्या ड्रममध्ये बसून त्यानी पाणीपट्टी माफीची मागणी केली होती.

Web Title: Dinesh Nasipudi sits in the water drum strike