दिपक ढवळीकरांचा विधानसभा प्रवेश निश्‍चित 

dhavalikar
dhavalikar

पणजी : शिरोडा मतदारसंघातून विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे व कालची शिरोड्यातील प्रचार फेरी पाहता ते येत्या निवडणुकीत विजयी होऊन विधानसभेत प्रवेश करतील असा ठाम विश्‍वास त्यांचे बंधू व सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला. 

राज्यातील लोकसभा व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, दिपक ढवळीकर ही माझ्यासारखेच विकासकामे करणारा तसेच दिवस-रात्र लोकांबरोबर फिरणारी व्यक्ती आहे. ते हाती घेतलेली कामे पूर्ण करण्यासाठी कामाचा सपाटाच लावतात. प्रियोळ मतदारसंघातून ते मागील विधानसभा निवडणुकीत हरले नाहीत, त्यांना या मतदारसंघातील इतर सर्वांनी एकत्रित होऊन त्यांना पराभूत केले. आता शिरोड्यातील लोकांनी त्यांना निवडणूक लढविण्यासाठी उचलून धरले आहे व काल शिरोड्यातील त्यांची निवडणूक प्रचार फेरी हे सिद्ध करते त्यांचा विजय निश्‍चित आहे. 

ते विधानसभेत प्रवेश करून मगोची ताकद आणखी वाढवतील. इतर मतदारसंघातील पोटनिवडणूक तसेच लोकसभा उमेदवार निवडीबाबतचा निर्णय सध्याच्या परिस्थितीत अजून झालेला नाही. हा निर्णय पक्षाची केंद्रीय समिती घेईल. जोपर्यंत ही समिती निर्णय घेत नाही तोपर्यंत इतरांबाबत मी बोलू शकत नाही असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com