साडेपंधरा हजार कोटींची करचुकवेगिरी उघड

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

आर्थिक वर्षात "डीजीसीईआय'ची कामगिरी

नवी दिल्ली: मागील आर्थिक वर्षात सेवाकर आणि उत्पादन शुल्काची 15 हजार 47 कोटी रुपयांची करचुकवेगिरी केंद्रीय उत्पादन शुल्क महासंचालनालयाने (डीजीसीईआय) उघडकीस आणली आहे.

आर्थिक वर्षात "डीजीसीईआय'ची कामगिरी

नवी दिल्ली: मागील आर्थिक वर्षात सेवाकर आणि उत्पादन शुल्काची 15 हजार 47 कोटी रुपयांची करचुकवेगिरी केंद्रीय उत्पादन शुल्क महासंचालनालयाने (डीजीसीईआय) उघडकीस आणली आहे.

"डीजीसीईआय'ने आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 12 हजार 112 कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस आणली होती. मागील आर्थिक वर्षात करचुकवेगिरी करणाऱ्या 13 जणांना अटक करण्यात आली तसेच, दीड हजार गुन्हे दाखल करण्यात आले. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 1 हजार 150 गुन्हे दाखल झाले होते. मागील अर्थिक वर्षात 2 हजार 410 कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 22 टक्के अधिक आहे.

"डीजीसीईआय'चे महासंचालक आर. के. महाजन म्हणाले, ""अधिकाऱ्यांच्या कठोर परिश्रमामुळे करचुकवेगिरी सापडण्याबरोबरच मोठी रक्कम जप्त झाली आहे. करचुकवेगिरी करण्याच्या नव्या पद्धतींचा छडा लावण्यासाठी अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त भागासह देशातील अन्य भागांमध्ये जाऊन तपास केला.'' छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलग्रस्त भागात करचुकवेगिरी करण्यासाठी सुरू असलेले गुटखा आणि पानमसाल्याचे कारखानेही डीजीसीईआयने यावर्षीच्या सुरवातीला शोधले होते.

Web Title: Disclosing the tax evasion of Rs. 15,500 crore