राजनाथ-शेख हसीना यांच्यात चर्चा

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा केली. राजनाथसिंह हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर येथे आले आहेत. दोन्ही देशांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्‌द्‌यांसह दहशतवादाच्या समस्येबाबतही शेख हसीना यांच्याशी चर्चा केल्याचे राजनाथसिंह यांनी ट्‌विटरद्वारे सांगितले.

ढाका : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा केली. राजनाथसिंह हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर येथे आले आहेत. दोन्ही देशांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्‌द्‌यांसह दहशतवादाच्या समस्येबाबतही शेख हसीना यांच्याशी चर्चा केल्याचे राजनाथसिंह यांनी ट्‌विटरद्वारे सांगितले.

उपखंडातील सर्व देश एकत्र आल्यास दहशतवादाचा बीमोड करणे शक्‍य असल्याचे सांगत राजनाथसिंह यांनी सर्व वाद चर्चेद्वारेच सोडविण्यावर भारताचा भर असल्याचे हसीना यांना सांगितले. हसीना यांनी भारताच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. ढाक्‍यामध्ये उद्यापासून (ता. 15) दोन देशांदरम्यान गृहमंत्री स्तरावरील सहावी बैठक होत असून, त्यासाठी राजनाथसिंह येथे आले आहेत. 

Web Title: discuss in rajnath singh and shaikh hasina