लोकसभा-विधानसभा एकत्र 16 मे रोजी चर्चा शक्‍य

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कायदा आयोग आणि निवडणूक आयोगाची येत्या 16 मे रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत एकत्र निवडणुका घेण्यासंबंधी घटनात्मक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बाबींच्या बाजूंवर चर्चा होणार आहे. 

नवी दिल्ली, ता. 9 (पीटीआय) : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कायदा आयोग आणि निवडणूक आयोगाची येत्या 16 मे रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत एकत्र निवडणुका घेण्यासंबंधी घटनात्मक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बाबींच्या बाजूंवर चर्चा होणार आहे. 

काही आठवड्यांपूर्वी कायदा आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातील प्रस्तावावर जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या होत्या. तसेच आयोगाने सर्व सदस्यांची बैठकही बोलावली होती. कायदा आयोगाकडून निवडणूक आयोगाला पाठवलेल्या प्रश्‍नांची दोन भागांत विभागणी केली आहे. त्यात पहिल्या भागात घटनात्मक मुद्दे आणि दुसऱ्या भागात कायदा, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांचा समावेश आहे. एकाच वेळी निवडणूक घेतल्याने काय फायदे होतील, याबाबत मत जाणून घेण्यास कायदा आयोग उत्सुक आहे. कायदा आयोगाचे प्रमुख निवृत्त न्यायधीश बी. एस. चौहान यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना 16 मे रोजी चर्चेसाठी बोलावले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 
 

Web Title: Discussion on Lok Sabha-Vidhan Sabha election