...म्हणून पाकिस्तानसोबत चर्चेची दारं बंद : परराष्ट्रमंत्री

...म्हणून पाकिस्तानसोबत चर्चेची दारं बंद : परराष्ट्रमंत्री

संयुक्त राष्ट्र : ''पाकिस्तानचा खरा चेहरा सगळ्यांनी पाहिला आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना वीरता म्हटले जात आहे. भारताकडून चर्चेसाठी योग्य प्रतिसाद दिला जात असतो. मात्र, सीमेपलीकडून वारंवार दहशतवादी हल्ले केले जातात. म्हणून आता पाकिस्तानसोबत चर्चेची दारं बंद झाली'', अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (शनिवार) पाकिस्तानला ठणकावले.

संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सभेत स्वराज बोलत होत्या. यावेळी त्यांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत पाकिस्तानचा समाचार घेतला.

- सुषमा स्वराज यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

- 'स्वच्छ भारत, समृद्ध भारता'साठी प्रयत्न केले जात आहे.

- 'स्वच्छ भारत' हा संकल्प 2022 पर्यंत पूर्ण करणार 

- मोदींना सन्मानित केल्याबद्दल आभारी.

- 'जनधन योजने'मुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.

- देशात सुमारे 32 कोटी जनधन खाती सुरु आहेत.

- उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 5 कोटी महिलांना मोफत गॅस.

दहशतवादाबाबत बोलताना स्वराज म्हणाल्या -

- सीमेशेजारील देशाकडून दहशतवाद पसरत आहे.

- दहशतवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानात होता. अमेरिकेने त्याचा खात्मा केला. हे त्यांचे यश. 

- भारत पाकिस्तानशी संवाद साधत नाही, असा आरोप केला जात आहे. मात्र, आम्ही अनेकदा बातचीत केली. पण यातून काहीही साध्य झाले नाही.

- पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान नेतृत्वाला शपथविधीसाठी आमंत्रण दिले होते.

- दहशतवादाचा राक्षक जगात फोफावतोय.

- दहशतवाद सीमेपलीकडून होत आहे.

- मानवाधिकाराचे उल्लंघन करणे पाकिस्तानचे नेहमीचे बनले आहे.

- दहशतवादाची खरी संकल्पना अद्याप स्पष्ट केली जात नाही.

- पाकिस्तानात दहशतवाद्यांना वीरता म्हटले जात आहे.

- तेथे दहशतवाद्यांच्या नावाने टपालाची तिकीटं काढली जात आहेत. त्यामुळे यावर संयुक्त राष्ट्र संघाने लक्ष द्यायला हवे.

- सगळ्यांनी पाकिस्तानचा चेहरा पाहिला.

- पाकिस्तानाकडून भारतावर खोटे आरोप केले जात आहेत.

- हाफिज सईदबाबत पाकिस्तानाकडून काहीही कारवाई केली नाही. 

- यावेळीही पाकिस्तानामुळे चर्चेची दारे बंद

- प्रत्येकवेळी पाकिस्तानामुळे चर्चेत अडथळे.

- पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com