नव्या मंत्रिमंडळाबाबत मोदी-शहांमध्ये प्रदीर्घ चर्चा

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मे 2019

- तब्बल पाच तास झाली चर्चा.

- घेण्यात आले महत्त्वपूर्ण निर्णय.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए-2) सरकारचा शपथविधी उद्या (ता.30) होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची, याबाबत चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात मॅरेथॉन बैठक पार पडली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा शपथविधी उद्या (गुरुवार) होत आहे. या मंत्रिमंडळातील सदस्यांची नाव अंतिम करण्यासाठी मोदी-शहा यांच्यात तब्बल पाच तास मॅरेथॉन चर्चा झाली. तसेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शहा यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.  

दरम्यान, अमित शहांना खरंच मंत्रिमंडळात संधी दिली जाणार का, याबाबत अद्याप भाजपकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही. त्यामुळे ऐनवेळी त्यांचे नाव मंत्रिमंडळात घेण्यात येईल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussions between Modi and Shah for the new Cabinet Ministry