यूपीतील मंत्र्याकडून दिव्यांगाचा अपमान

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

लखनौ: योगी आदित्यनाथ सरकारने दिव्यांग व्यक्तीला सन्मान देण्यासाठी विभागाचे नाव बदलून दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे केलेले असताना मात्र त्यांच्याच सरकारमधील खादी आणि ग्रामोद्योगमंत्री सत्यदेव पचौरी यांनी एका दिव्यांगाविषयी अपमानास्पद व्यक्तव्य केल्याचे उघडकीस आले आहे.

पचौरी काल खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात तपासणीसाठी गेले होते. मात्र, तेथे काम करणाऱ्या एका अपंग सफाई कर्मचाऱ्यांसमोरच मंडळाच्या सीईओंना म्हटले की, "अपंगांना साफसफाईसाठी ठेवले आहे. ते काय सफाई करतील. त्यामुळेच कार्यालयाचे हे हाल आहेत. काल पचौरी डालीबाग येथील कार्यालयात गेले आणि तेथे जाताच त्यांनी मुख्य दरवाजा बंद केला. कार्यालयात ठिकठिकाणी कचरा पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. सायंकाळपर्यंत कचरा साफ झाला नाही तर डोक्‍यावर कचरा ठेवून बाहेर काढायला लावीन, अशीही तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

Web Title: Disgraced Devyanga by the UP minister