
शेतकरी आंदोलना संदर्भातील आक्षेपार्ह टूलकिटमुळे अटक करण्यात आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला आज तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी आकाश जैन यांनी हे निर्देश दिले.
नवी दिल्ली - शेतकरी आंदोलना संदर्भातील आक्षेपार्ह टूलकिटमुळे अटक करण्यात आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला आज तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी आकाश जैन यांनी हे निर्देश दिले. दिशा हिची पाच दिवसांची कोठडी आज संपुष्टात आल्यानंतर तिला न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते. दिशाची आतापर्यंत कोठडीमध्ये झालेली चौकशी पुरेशी नाही, याप्रकरणातील अन्य सहआरोपी शंतनू मुकुल आणि निकीता जेकब यांची चौकशी करण्यात येईल असे पोलिसांनी आजच्या सुनावणीदरम्यान सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याआधी दिशा रवीने स्वतःचा बचाव करण्यासाठी यासंदर्भातील सारे दोष सहआरोपींवर ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मुकुल आणि जेकबला २२ फेब्रुवारी रोजीच चौकशीला सामोरे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खुद्द तपास संस्थेकडूनच आज न्यायालयामध्ये ही माहिती देण्यात आली. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलिसांच्या याचिकेला विरोध केला तसेच दिशाची सुटका करण्याची मागणी केली होती.
इंधन दरवाढीवर अमूलचं कार्टूनद्वारे मार्मिक भाष्य; नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
ग्रेटाकडून दिशाचे समर्थन
आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने दिशा रवीचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याच्या अधिकारासोबत तडजोड करता येत नाही. लोकशाहीचा तो मूलभूत भाग असायला हवा, असे ग्रेटाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
Edited By - Prashant Patil