सरकार बरखास्त करून दाखवा; ममतांचे केंद्राला आव्हान

श्‍यामल रॉय
Tuesday, 17 December 2019

त्या जाहिराती काढा - राज्यपाल
पश्‍चिम बंगालमध्ये एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला जाणार नाही, असे सांगणाऱ्या जाहिराती घटनाविरोधी असून, त्या तातडीने बंद कराव्यात, असे राज्याचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी राज्य सरकारला सांगितले आहे. या जाहिरातींमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच नागरिकांना वरील आश्‍वासन देत आहेत. अशा अपप्रचारासाठी राज्याच्या प्रमुखानेच जनतेच्या पैशांचा गैरवापर करणे अयोग्य आहे, असे धनकर यांनी म्हटले आहे. तसेच, आदेश देऊनही राज्याचे पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिव यांनी राज्यातील ताज्या परिस्थितीची माहिती न दिल्याने संतप्त झालेल्या राज्यपालांनी ही माहिती देण्याची सूचना ममता बॅनर्जी यांनाच केली आहे.

कोलकता - हजारो पक्ष कार्यकर्त्यांना सोबत घेत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात रस्त्यावर उतरल्या. सरकार बरखास्त केले तरी या दोन्ही गोष्टी राज्यात लागू होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी केंद्राला आव्हान दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा मोर्चा घटनाविरोधी आणि चिथावणीखोर होण्याचा राज्यपाल जगदीप धनकर यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत कोलकत्यातील रेड रोड भागातून ममता यांनी मोर्चाला सुरुवात केली. मोर्चा निघण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांना शपथ देवविली. ‘राज्यात एनआरसी आणि नागरिकत्व कायदा लागू होऊ देणार नाही. सर्व जाती, वंश आणि धर्मांच्या सहअस्तित्वावर आमचा विश्‍वास आहे,’ असे त्यांनी शपथ घेताना सांगितले. त्या म्हणाल्या की, भाजपने भाडोत्री गुंडांकरवी हिंसाचार घडविला आहे

'शंकरा'नंतर तान्हाजी सिनेमाचं 'माय भवानी' गाणं एकदा पाहाच!

मात्र, मी जिवंत असेपर्यंत नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू होऊ देणार नाही. माझे सरकार बरखास्त करा, मला तुरुंगात टाका, तरीही हा काळा कायदा लागू होऊ देणार नाही. हा कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल. कायदा लागू करायचाच असल्यास आधी माझा मृतदेह पहावा लागेल. आंदोलन करणाऱ्यांनी हिंसाचार करू नये, असे आवाहनही ममतांनी केले.  दरम्यान, बंगालमध्ये सलग चौथ्या दिवशी आंदोलन सुरूच होते.  दरम्यान, आसाममधील परिस्थिती सुधारत असून, या ठिकाणी तैनात लष्कराच्या तुकड्या बराकींमध्ये परततील, अशी आशा कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केली आहे.

#WorldTeaDay : तुम्ही चहाचा इतिहास वाचलाय का?

पश्‍चिम बंगालमधील हिंसक आंदोलनाला राज्याच्या बाहेरील काही शक्ती खतपाणी घालत आहेत. या शक्ती भाजपसाठी काम करीत असून, त्यांच्या सापळ्यात अडकू नका. राज्यात हिंसाचार करण्यासाठी काही लोकांना भाजपकडून पैसे दिले जात आहेत.
- ममता बॅनर्जी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dismiss the government and show Mamatas challenge to the Center