रामदेव बाबांच्या ‘कोरोनील’वरून वाद

Coronil
Coronil

नवी दिल्ली - योगगुरु रामदेव बाबा यांच्या कोरोनील या कोरोना संसर्गावरील आयुर्वेदिक औषधावरून भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना जो जाब विचारला त्यावरून त्याच आयएमएचाच भाग असलेल्या दिल्ली वैद्यकीय संघटनेने (डीएमए) आपल्या मातृसंस्थेवर टीका केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांना विनाकारण लक्ष्य (टार्गेट) केले जात असल्याचे डीएमएने म्हटले आहे. देशाच्या आरोग्यमंत्र्यांचा हा अपमान असल्याचे डीएमएने म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पतंजली उद्योगसमूहाने बनविलेल्या कोरोनील या कथित आयुर्वेदिक औषधाला मान्यता दिलेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्पष्ट केले. मात्र भारताचे आयुष मंत्रालय त्यापूर्वीच रामदेव यांच्या औषधाला मान्यता प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले. या औषधाच्या उद्घाटनाला डॉ. हर्षवर्धन व नितीन गडकरी यांच्यासारखे दिग्गज मंत्री हजर होते. त्यावरून आयएमएने एक पत्र पाठवून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना जाब विचारला होता. या पत्रामुळे डीएमए भलतीच संतप्त झाली. यातून रामदेवबाबांच्या कथित कोरोना औषधाने आयएमएमध्येच फूट पडल्याचे चित्र तयार झाले आहे. 

स्वागत करायला हवे
‘डीएमए’चे अध्यक्ष डॉ. वाधवा म्हणाले, की एखाद्या आयुर्वेदिक कंपनीने औषध बनविले व भारतातील सर्व संबंधित यंत्रणांनी त्याला मान्यता प्रमाणपत्र दिले आहे तर त्याचे स्वागत करायला हवे. आज कोरोनावर जेथे मिळेल तेथून औषध विकसित होणे आवश्‍यक आहे. मात्र त्यावरून डॉ. हर्षवर्धन यांना लक्ष्य करणे चुकीचे आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com