बॅंकांच्या रांगेतील लोकांना लाडूवाटप

पीटीआय
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारविरोधात नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निरनिराळे उपाय योजले जात आहेत. त्यामुळेच दिल्ली भाजपकडून बॅंका व एटीएमच्या रांगेत उभे राहणाऱ्यांना लाडू वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांप्रती कृतज्ञता म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक अशाप्रकारे लाडूचे वाटप करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे दिल्ली भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सांगितले. 1 ते 10 जानेवारीपर्यंत भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लाडू वाटतील, असे तिवारी म्हणाले.

Web Title: Distribution of the queue of banks Blogger