‘जिला गोरखपूर’ वादाच्या भोवऱ्यात

यूएनआय
मंगळवार, 31 जुलै 2018

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनाशी थोडे साम्य असलेल्या ‘जिला गोरखपूर’ या चित्रपटाबद्दल बॉलिवूडमध्ये उत्सुकता असली, तरी निमार्त्याने चित्रपटाचे पहिले टिझर प्रदर्शित केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. यात भगव्या वस्त्रातील व्यक्तीने पाठीमागे हातात पिस्तूल धरलेले दाखविले आहे. यामुळे निर्मात्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हा चित्रपट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित नसल्याचा खुलासा निमार्त्याने केला असला, तरी स्थानिक भाजप नेत्यांचे त्यावर समाधान झाले नसून, निर्माते विनोद तिवारी यांच्यावर ‘एफआयर’ दाखल करण्यात आली आहे.

‘जिला गोरखपूर’मध्ये आदित्यनाथ यांची प्रतिमा चुकीची चित्रीत केली असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी खुली धमकी भाजप नेत्यांनी दिली आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रविवारी (ता. २९) प्रदर्शित करण्यात आले. हा चित्रपट योगी आदित्यनाथांवर आधारित असल्याचे सांगण्यात येत असले, तरी सध्या घडलेल्या झुंडशाहीकडून होणाऱ्या मारहाणीवर आधारित चित्रण यात असल्याची चर्चाही आहे.

भाजपचे नेते व उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आय. पी. सिंह यांनी तिवारी व अन्य काही जणांविरोधात लखनौ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. ‘‘क्षुल्लक आर्थिक लाभासाठी निर्मात्याने सर्व हद्द पार केली आहे. समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे,’’ असे ट्विट सिंह यांनी केले असून, या चित्रपटाच्या आर्थिक स्त्रोताची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी चित्रपट निर्मात्याने हिंदू संस्कृतीवर हल्ला केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न तिवारी यांनी केल्याने मी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
- आय. पी. सिंह, भाजप नेते

Web Title: district gorakhpur in dispute