लसीकरणाची जिल्हावार यादी करा; काँग्रेसची मागणी

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय असतानाही केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

नवी दिल्ली - लस टंचाईवरून (Vaccine Shortage) केंद्र सरकारला 9Central Government) घेरताना काँग्रेसने (Congress) दिल्ली, तेलंगण, महाराष्ट्र या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) थांबविल्याकडे लक्ष वेधले आहे. गृहमंत्री आणि त्यांचे मंत्रालय मात्र लस टंचाई नसल्याचा दावा करत आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला असून जिल्हावार लसीकरणाची यादी सरकारने नियमितपणे प्रसिद्ध करावी, अशी सूचनाही केली आहे. (Districtwise List of Vaccinations Congress demand)

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय असतानाही केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला. तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, सरकारच्या उदासीनतेमुळे लसीची प्रतिक्षा करणे भाग पडत आहे. दिल्ली, तेलंगण, महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये लस नसल्यावरून केंद्र सकारला धारेवर धरले. या राज्यांनी लसटंचाईचे कारण देत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित केले आहे. तरीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गृहखाते लसटंचाईचा इन्कार करत आहेत.

Rahul Gandhi
शिक्षकाचे टॉवेलमध्ये ऑनलाईन क्लासेस; विद्यार्थ्यांनी छेडलं आंदोलन

दिल्लीने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण थांबविल्याच्या निर्णयानंतर तेलंगणमध्येही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबल्याने वाद सुरू झाला आहे. लस साठा नसल्यामुळे तेलंगणमधील ३३ पैकी २९ जिल्ह्यांमध्ये कोणालाही लस मिळालेली नाही. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने जिल्हावार लसीकरणाचा दैनंदिन तपशील द्यावा, असेही ट्विट चिदंबरम यांनी काल केले होते.

देशातील ग्रामीण जिल्ह्यांमध्ये लसीकरणच नाही, मात्र जिल्हानिहाय लसीकरणाचे आकडे देखील पुढे येत नाहीत. सरकारचा नकार आणि उदासीनता याचा फटका लसीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना बसतो आहे.

- पी. चिदंबरम, काँग्रेस नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com