'आम आदमी'च्या प्रतिमेतून बाहेर पडा : केजरीवाल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यात व्यग्र असतो. त्यामुळे स्वत:च्या कामांची लोकांना माहितीच देतच नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत माहितीच पोचत नाही. त्यामुळे ही कामे आम आदमी पक्षाने केली आहेत, हे लोकांना कळतच नाही. केलेल्या कामांचे श्रेय घ्यायला हवे.

नवी दिल्ली - "आम आदमी'च्या प्रतिमेतून बाहेर पडा आणि आमदारांसारखे वागा,' असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या आमदारांना दिला आहे. सामान्य लोकांमधील पक्षाच्या प्रतिमेमुळेच पक्षाचे मूळ मतदार दुरावले आहेत, असे मत पक्षाच्या आमदारांनी केजरीवालांकडे व्यक्त केले. त्यावरच केजरीवालांनी आपली प्रतिमा बदलण्याचा सल्ला दिला. 

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आम आदमी पक्षाने निकालाची कारणमीमांसा सुरू केली आहे. यासाठी केजरीवाल यांनी पक्षाच्या आमदारांसोबत संवाद साधला. "जनहिताची कामे करूनही आम आदमीसारखेच राहात असल्याने पक्षाला फटका बसला, असे मत अनेक आमदारांनी व्यक्त केले. ""केजरीवाल यांनी प्रतिमा बदलण्याचा सल्ला दिला असला तरी, यामुळे आमदारांच्या वेशभूषेत कोणताही फरक पडणार नाही. आम आदमी पक्षाचे आमदार इतर पक्षांतील नेत्यांसारखे कुर्ता पायजाम्यात दिसणार नाहीत. मात्र, कामांची दखल घेतली जाईल, असा प्रयत्न आमदारांकडून केला जाईल,'' अशी माहिती सूत्रांनी दिली. 

"आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यात व्यग्र असतो. त्यामुळे स्वत:च्या कामांची लोकांना माहितीच देतच नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत माहितीच पोचत नाही. त्यामुळे ही कामे आम आदमी पक्षाने केली आहेत, हे लोकांना कळतच नाही. केलेल्या कामांचे श्रेय घ्यायला हवे,'' असेही आमदारांनी केजरीवालांना सांगितले. 

Web Title: Ditch The 'Aam', Behave Special: Arvind Kejriwal's New Mantra For AAP Lawmakers