थेट अयोध्येतून : अयोध्येमध्ये सुरू झाली दिवाळी ! 

ayodhya verdict (2).jpeg
ayodhya verdict (2).jpeg

अयोध्या : रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अयोध्येमध्ये दिवाळीनंतर पुन्हा सुरू झाल्याचे शनिवारी दिसून आले. दिव्यांच्या रोषणाईमुळे घरांपासून बाजारपेठांपर्यंत अवघी अयोध्या उजळून निघाली. 

निकालाच्या धास्तीमुळे शनिवारची सकाळ अयोध्येत पोलिसांच्या धडकी भरविणाऱ्या बंदोबस्ताने उजाडली. निकाल आजच जाहीर होणार, हे निश्चित झाल्यावर शुक्रवारी दुपारपासूनच कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात झाला. त्यामुळे दुचाकी, सायकल रिक्षा, ई- रिक्षा यांचीही वाहतूक बंद झाली. त्यामुळे रस्त्यांवर सामसूम झाली होती. पण, खटल्याचा निकाल जाहीर झाला आणि अयोध्येचा नूर बदलून गेला. वातावरणातील तणाव निवळला आणि रस्त्यांवर माणसे दिसू लागली. 

सायंकाळी सहा वाजल्यानंतर पोलिस बंदोबस्तात थोडी शिथिलता आली. रस्त्यांवर सायकल रिक्षा फिरू लागल्या. त्यामुळे रस्ते गर्दीने भरून गेले. बाजार पेठेतील दुकानांसमोर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती, तर काही ठिकाणी रोषणाईसाठी विजेच्या माळा सोडण्यात आल्या होत्या.  काही दुकानदारांनी मेणबत्या लावून आनंद व्यक्त केला.  परिसरातील घरांसमोरही सणांच्या वेळी जशी रांगोळी काढली जाते, त्या नुसार सजावट करून दिवे लावण्यात आले होते. 
बाबरी मशीद जमीनदोस्त होत होती आणि सुरक्षा दल निष्क्रीयपणे पाहत होतं!

विविध महंतांचे अनेक मठ, ही धर्मनगरी म्हटल्या जाणाऱ्या अयोध्येची खास ओळख. दिवाळीच्या जल्लोषापासून हे मठ मागे नव्हते तर, काकणभर पुढेच होते. मठांमध्ये विद्युत रोषणाई, दिवे, मेणबत्या लावण्यात आल्याचे शहरात फिरताना दिसून आले. त्यामुळे पुन्हा दिवाळी सुरू झाल्यासारखे वाटत होते.
रामानं घडवलेलं राजकीय महाभारत!
गोमाता ते रामलल्ला!

हनुमान गढी जवळील कपड्यांचे व्यावसायिक  राजू गुप्ता म्हणाले, ''अयोध्येचा एवढ्या वर्षांचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटला आहे. त्याचा आनंद होत असल्यामुळे उस्फूर्तपणे लोक दिवाळी साजरी करीत आहेत.'' या पुढील काळात आता भव्य राममंदिर कसे साकारणार, या कडे लक्ष लागले आहे, असेही त्यांनी सांगितले. 
रामजन्मभूमीचा लढा हा विटा-मातीच्या इमारतीसाठीचा संघर्ष नव्हे!
थेट अयोध्येतून : राममंदिरासाठी 65 टक्के कोरीव काम पूर्ण! (Video)

रामजन्मभूमीपासून सुमारे दीड-दोन किलोमीटर अंतरावर भाजपचे स्थानिक आमदार वेदप्रकाश गुप्ता यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्याची तयारी केली होती. पण, पोलिसांनी अटकाव केल्यामुळे त्यांना आवरते घ्यावे लागले.
रामजन्मभूमीसाठी अशी सुरू झाली कारसेवा!
Ayodhya Verdict : अयोध्यातील घटनाक्रम : 1528-2019 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com