दिवाळीत स्वदेशीचा चिनी वस्तूंना धोबीपछाड

कोरोनाच्या साथीतून यंदा थोडा दिलासा मिळाला असल्याने देशात दिवाळी आनंदाने व उत्साहात साजरी झाली. यावेळच्या दिवाळीत देशभरात १.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री झाली.
दिवाळीत स्वदेशीचा चिनी वस्तूंना धोबीपछाड

नवी दिल्ली - कोरोनाच्या साथीतून यंदा थोडा दिलासा मिळाला असल्याने देशात दिवाळी आनंदाने व उत्साहात साजरी झाली. यावेळच्या दिवाळीत देशभरात १.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री झाली. विशेष म्हणजे स्वदेशी वस्तूंना (व्होकल फॉर लोकल) नागरिकांनी प्राधान्य दिले. यामुळे चीनला ५० हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे, असा दावा कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) शुक्रवारी (ता. ५) केला. गेल्या दहा वर्षांतील ही विक्रमी विक्री असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यावर्षीच्या दिवाळीत सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांची विक्री झाली असल्याचा दावा ‘सीएआयटी’चे अध्यक्ष बी.सी भरतिया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी केला आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन संस्थेने गेल्या वर्षी केले होते, असे त्यांनी सांगितले. त्याला ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यानेच यंदा दिवाळीत चीनी बाजारपेठेचे ५० हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी दिवाळीच्या काळात छोटे कारागीर, कुंभार, शिल्पकार आणि स्थानिक कलाकारांच्या उत्पादनांची चांगली विक्री झाली, असेही भरतिया आणि खंडेलवाल यांनी सांगितले.

दिवाळीत स्वदेशीचा चिनी वस्तूंना धोबीपछाड
Podcast: "शेन वॉर्नने मला हॉटेलच्या खोलीत बोलवलं होतं"

‘सीएआयटी’चा आढावा

  • ‘सीएआयटी संशोधन व व्यापार विकास सोसायटी’ (सीआरटीडीएस) या संशोधन विभागाचा दूरध्वनीवरून सर्व्हे

  • दिल्ली, मुंबई, नागपूर, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, चंडीगड, रायपूर, भुवनेश्‍वर, कोलकता, रांची, गुवाहाटी, पाटणा, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, मदुराई, पुदुच्चेरी, भोपाळ व जम्मू या शहरात सर्व्हे झाला

  • देशातील २० शहरांमधील व्यापारी किंवा आयातदारांनी खास दिवाळासाठीच्या वस्तू, फटाके व अन्य साहित्यासाठी चीनमधील निर्यातदारांकडे मागणी नोंदविली नव्हती

फटाके उद्योगाचे नुकसान

भरतिया म्हणाले, या वेळी दिवाळीत मुख्यत्वे फटाके व्यावसायिकांचे नुकसान झाले. अनेक राज्यांनी फटाके फोडण्यासंबंधी संदिग्ध भूमिका घेतल्याने फटाके तयार करणारे छोट्या व्यावसायिकांचे सुमारे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झालो आहे.

या वस्तूंची सर्वाधिक विक्री

‘सीएआयटी’च्या म्हणण्यानुसार यंदा मागणी असलेल्या व कमी किमतीतील ग्राहकोपयोगी वस्तू, अत्यावश्‍यक वस्तू, खेळणी, विजेवरील उपकरणे व वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाक घरातील वस्तू व सहाय्यक उपकरणे, मिठाई, गोडाचे पदार्थ, गृहसजावट, भांडी, सोने-चांदी, पादत्राणे, घडाळे यांची खूप विक्री झाली. याशिवाय कपडे, फर्निचर, फॅशनेबल पोशाख, पणत्यांसह पूजेचे सामान, देवतांच्या मूर्ती, सजावटीच्या वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, सौभाग्य प्रतीके (शुभ-लाभ, ओम आदी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com