उत्तर प्रदेशात ‘डीजे’बंदी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

उत्तर प्रदेशात ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून ‘डीजे’वर बंदी घालण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. डीजे वाजविणाऱ्यांना एक लाख रुपये दंड व पाच वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

प्रयागराज - उत्तर प्रदेशात ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून ‘डीजे’वर बंदी घालण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. डीजे वाजविणाऱ्यांना एक लाख रुपये दंड व पाच वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज निकाल देण्यात आला. या वेळी न्यायालायने ‘डीजे’वर बंदी घालण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. डीजे ज्या भागामध्ये वाजवला जाईल, त्या भागातील पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. शिवाय, व्हॉट्‌सॲप, ई-मेल वरून आलेल्या डीजेच्या तक्रारींबाबत कारवाई केली जाईल. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.

ध्वनिप्रदूषणाबाबतच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात याचिका दाखल करून घेतली जाईल. सरकारने घालून दिलेल्या नियमानुसारच लाउडस्पीकरचा आवाज ठेवावा लागेल, असेही न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. डीजेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णालयामधील रुग्णांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या मूळ अधिकाऱ्यांवर गदा येत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DJ ban in Uttarpradesh High Court State Government