जलिकट्टूवरून डीएमके आक्रमक

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

चेन्नई - तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने आज जलिकट्टूचा मुद्दा उचलून धरत राज्यभर निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अभिनेते व इतरांना भेटण्यास वेळ आहे. मात्र, याविषयी चर्चा करण्यासाठी गेलेल्या द्रमुकच्या नेत्यांना भेटण्यास ते वेळ देत नाहीत, अशी टीका डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केली आहे.

स्टॅलिन म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना ओळखतात त्यांनाच भेटीसाठी वेळ देतात. अशा लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे. मला त्यांची निंदा करायची नाही कारण त्यांचे स्वतःचे तसे स्थान आहे. मात्र, तमिळनाडूच्या परंपरेशी संबंधित जलिकट्टूसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.''

जलिकट्टू खेळाच्या आयोजनासंबंधी केंद्र सरकारने तत्काळ अध्यादेश काढावा, तसेच सत्ताधारी अण्णा द्रमुकनेही हा मुद्दा उचलून धरत केंद्रावर दबाब टाकावा, अशी अपेक्षा स्टॅलिन यांनी या वेळी व्यक्त केली. यासंबंधी तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यातील जनता दोघांनाही माफ करणार नाही, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

प्राणी कल्याण मंडळ (एडब्ल्यूबीआय) बरखास्त करून त्याऐवजी एका समितीची स्थापना करावी आणि या समितीत तमिळनाडूतील नागरिकांना स्थान मिळावे.
- स्टॅलिन द्रमुक, कार्यकारी अध्यक्ष

Web Title: dmk aggressive on jallikattu