द्रमुकचे प्रमुख करुणानिधी रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

करुणानिधी हे गेल्या महिनाभरापासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले नाहीत. गेल्या महिन्यात तमिळनाडूतील तीन विधानसभा पोटनिवडणुकांमध्येही ते प्रचारात उतरले नव्हते.

चेन्नई - जंतूसंसर्गामुळे द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांना आज (गुरुवार) पहाटे चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

करुणानिधी हे गेल्या महिनाभरापासून जंतूसंसर्गामुळा आजारी आहेत. त्यांना काही चाचण्या करण्यासाठी आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. करुणानिधी यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे, रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

करुणानिधी हे गेल्या महिनाभरापासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले नाहीत. गेल्या महिन्यात तमिळनाडूतील तीन विधानसभा पोटनिवडणुकांमध्येही ते प्रचारात उतरले नव्हते. डॉक्टरांनी त्यांनी आरामाचा सल्ला दिल्याचे पक्षाकडून नुकतेच स्पष्ट करण्यात आले होते. द्रमुकचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

Web Title: DMK chief Karunanidhi admitted to hospital