esakal | "हिंदू-मुस्लिमांचा DNA एकच तर 'लव्ह जिहाद' कायदा कशासाठी?"
sakal

बोलून बातमी शोधा

Mohan Bhagwat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरुन काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी भागवत यांची खिल्ली उडवली आहे

"हिंदू-मुस्लिमांचा DNA एकच तर 'लव्ह जिहाद' कायदा कशासाठी?"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरुन काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी भागवत यांची खिल्ली उडवली आहे. जर सर्व हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर याचा अर्थ मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसी यांचा डीएनएही एकच असेल. राज्यसभा खासदार दिग्विजय सिंग यांनी म्हटलं की, 'जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे, तर धर्म परिवर्तन कायद्याचा काय फायदा?' (DNA of Hindus Muslims same then what is use law against religious conversion Digvijaya Singh)

‘सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे, त्यामुळे ‘भारतात इस्लामला धोका असल्याच्या’ भयचक्रात मुस्लिमांनी अडकू नये, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. धर्माच्या नावाने जे लोक एखाद्या व्यक्तीची हत्या करतात, हे हिंदुत्वाच्या विरोधी कृत्य करतात. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वाद हा चर्चेतूनच सोडविता येईल. भारतात इस्लाम धोक्यात आहे या भयचक्रात कोणीही अडकू नये. आपण सर्व जण लोकशाही देशात राहतो. त्यामुळे हिंदूंचे किंवा मुस्लिमांचे वर्चस्व देशात असू शकत नाही, असं ते म्हणाले होते. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा: राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस; कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावरुन दिग्विजय सिंग यांनी निशाणा साधला. जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर धर्म परिवर्तन कायद्याचा काय अर्थ आहे? लह जिहादच्या कायद्याचा काय फायदा आहे? आचा अर्थ असं होईल की, मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसी यांचा डीएनएही एकच असेल, असं सिंह म्हणाले.

हेही वाचा: लशीमुळे मृत्युचा धोका कमी; ICMR चा दावा

दरम्यान, हिंदू-मुस्लिम एकता हा दिशाभूल करणारा शब्द आहे. हे दोघे मुळात वेगळे नाहीतच, एकच आहेत. धर्म कोणताही असो, सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, असं भागवत म्हणाले होते. भारतात एकतेशिवाय प्रगती होणे शक्य नाही. ही एकता राष्ट्रवाद आणि पूर्वजांचे वैभव या आधारावर असावी. हिंदूंचे किंवा मुस्लिमांचे वर्चस्व देशात असू शकत नाही. केवळ भारतीयांचेच येथे वर्चस्व असेल, असंही ते कार्यक्रमात म्हणाले होते.

loading image