'जात, वर्णाच्या वादात हनुमानाला ओढू नये'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पाटणा : जात आणि वर्णाच्या वादात पवनपुत्र हनुमानाला ओढू नये, असे मत रामकथावाचक मुरारीबापू यांनी शुक्रवारी व्यक्त केले. हवेला जशी जात नसते, तशी हनुमानाला कोणतीही जात नसते, असे ते म्हणाले. 

हनुमान हे दैवत समाजाला जोडणारे आणि समन्वयक आहे. हनुमान म्हणजे प्राणवायू असल्याचे त्यांनी बेगूसराय जिल्ह्यातील समिरियामध्ये बोलताना सांगितले. राष्ट्रकवी दिनकर यांच्या या गावात सध्या साहित्यिकांचा मेळावा आणि रामकथेचा कार्यक्रम सुरू आहे. नऊ डिसेंबरला या कार्यक्रमाची सांगता होईल. 

हनुमानाला वादात ओढण्याच्या प्रवृत्तीवर मुरारीबापू यांनी नाराजी व्यक्त केली. हनुमानाबद्दलचे विधान का केले, हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच सांगू शकतील, असे मत व्यक्त करत त्यांनी हनुमान म्हणजे समाजसेवक असल्याचे नमूद केले. राममंदिराबाबत बोलताना मुरारीबापू म्हणाले, "निवडणूक वर्षात अयोध्येत मंदिर व्हायला हवे; पण ते सर्वांच्या संमतीने झाल्यास तो सर्वोत्तम पर्याय ठरेल. सर्व धर्मांचा आदर राखूनच मंदिर बांधले जावे. मंदिराची निर्मिती हा जनतेच्या श्रद्धा आणि भावनेचा प्रश्‍न असला तरी, कोणाचा अनादरही होऊ नये.'' 

हनुमानाच्या जातीचे प्रमाणपत्र मागितले 

वाराणसी : भगवान हनुमानाच्या जातीवरून राजकीय वाद सुरू असताना येथे हनुमानाचे जात प्रमाणपत्राचीच मागणी झाल्याने यात आणखी भर पडली आहे. उत्तर प्रदेशातील प्रगतशील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव यांनी जिल्हा प्रशासनाकडे हे प्रमाणपत्र मागितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच हनुमानाला दलित म्हणत देवाला जातीच्या राजकारणात ओढल्याने आम्हाला आता प्रमाणपत्र हवे आहे, असे यादव यांनी सांगितले. 

Web Title: Do not drag Hanuman into caste and caste disputes