भाजप व मोदींना एकही मत देऊ नका: ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

भाजप व पंतप्रधान मोदी यांना एकही मत देऊ नका, ते देशाचा नाश करत आहेत,'' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे. 

नामखाना (24 परगणा) ः भाजप व पंतप्रधान मोदी यांना एकही मत देऊ नका, ते देशाचा नाश करत आहेत,'' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे. 

"मोदींनी गेल्या पाच वर्षांत देशासाठी काही केले नाही. जर तुम्ही "चौकीदारा'ला पंतप्रधानपदी निवडले, तर देशाला नष्ट करतील. भाजपला एकही मत न देता तुम्ही त्यांना सत्तेवरून हुसकावून लावू शकता,'' अशी तीव्र टीका ममता बॅनर्जी यांनी येथील जाहीर सभेत केली. 

"भारतीय जनता पक्षाने अल्पसंख्याक, आदिवासी आणि पत्रकारांच्या हत्या केल्या,'' असा आरोप करून ममता म्हणाल्या, ""भाजपला घाबरण्यासारखे काही नाही. त्यांना एकही मत देऊ नका. तसेच, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कॉंग्रेसलाही मते देऊ नका, कारण त्यांना मते देणे म्हणजे भाजपचे हात मजबूत करण्यासारखे आहे.'' 

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणावरही ममतांनी सडकून टीका केली. "नोटाबंदीमुळे देशातील तीन प्रमुख क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या गेल्या,'' असे त्या म्हणाल्या. पेट्रोल, डिझेलचे दर गेली पाच वर्षे सतत वाढत आहेत, याचीही आठवण त्यांनी करून दिली. 

भाजपने ताजपूर येथे बंदर उभारणीबाबत दिलेले आश्‍वासन पाळले नाही. आता हे बंदर राज्य सरकार स्वतःच्या खर्चाने बांधेल, असे सांगून त्या म्हणाल्या, ""तृणमूलच्या कारकिर्दीत बेरोजगारी 40 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. येत्या तीन-चार वर्षांत गंगासागरमधील मुरीगंगा येथे एक हजार कोटी रुपये खर्च करून नवा पूल बांधण्यात येईल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not give a single vote to Modi says Mamata Banerjee