विवाह कार्यासाठी अडीच लाख मिळेनात!

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचना नसल्याने बॅंकांचा पैसे देण्यास नकार
नवी दिल्ली - विवाह कार्यासाठी बॅंकेतून अडीच लाख रुपये काढण्याची सवलत अद्याप सुरू झालेली नसून ती पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने या आठवड्याच्या सुरवातीला याबाबत घोषणा केली होती; मात्र रिझर्व्ह बॅंकेकडून मार्गदर्शक सूचना नसल्याने याची अंमलबजावणी रखडली आहे.

याविषयी पंजाब नॅशनल बॅंकेच्या व्यवस्थाकीय संचालक उषा अनंतसुब्रह्मण्यम म्हणाल्या, ""रिझर्व्ह बॅंकेने मार्गदर्शक सूचना जाहीर न केल्याने विवाह कार्य असलेल्या कुटुंबांना अडीच लाख रुपये देता आले नाहीत. आम्ही मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा करत आहोत. या सूचना सोमवारी मिळण्याची शक्‍यता असून, मंगळवारपासून बॅंकेच्या शाखांतून विवाह कार्यासाठी अडीच लाख रुपये देण्यास सुरवात होईल. वधू-वरांनी अथवा त्यांच्या पालकांनाच हे पैसे काढता येणार आहेत; मात्र यातील एकालाच हे पैसे काढण्याची परवानगी मिळेल. वधू व वराच्या कुटुंबाला स्वतंत्ररीत्या अडीच लाख काढता येतील.''

रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचना नसल्याने अन्य बॅंकांनीही विवाह कार्यासाठी अडीच लाख देण्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. कॉर्पोरेशन बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ""रिझर्व्ह बॅंकेकडून मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतर विवाह कार्यासाठी अडीच लाख रुपये देण्यास सुरवात होईल. बॅंकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकाला आवश्‍यक कागदपत्रे दाखल करावी लागतील.''

मोकळ्या हाती परतावे लागले
केंद्र सरकारने विवाह कार्यासाठी एका कुटुंबाला अडीच लाख रुपये बॅंकेतून काढण्याची मुभा या आठवड्याच्या सुरवातीला दिली. यानंतर विवाह कार्य असलेल्या अनेक जणांनी बॅंकांमध्ये गर्दी करण्यास सुरवात केली; मात्र बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या सूचना नसल्याने त्यांना मोकळ्या हाती परत पाठविले. विवाह कार्यासाठी अडीच लाख रुपये काढण्यासाठी विवाह पत्रिकेसोबत अन्य पुरावेही सादर करण्यास सरकारने सांगितले होते.

Web Title: do not give Two and a half million for marriage work!