सेवा शुल्क ग्राहकांनी भरू नये- ग्राहक कल्याणमंत्री

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली : हॉटेलमध्ये ग्राहकांना सेवा शुल्क आकारणे ही अयोग्य पद्धत असून, ग्राहकांनी तो भरण्याची गरज नाही, असे मत ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी व्यक्त केले.

नवी दिल्ली : हॉटेलमध्ये ग्राहकांना सेवा शुल्क आकारणे ही अयोग्य पद्धत असून, ग्राहकांनी तो भरण्याची गरज नाही, असे मत ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी व्यक्त केले.

पासवान म्हणाले, ""सध्याच्या कायद्यात ग्राहकांना सेवा शुल्क आकारणाऱ्या हॉटेल अथवा रेस्टॉरंटवर कारवाई करण्याची तरतूद नाही. मात्र, ग्राहकांना सेवा शुल्क न भरण्याचे स्वातंत्र्य असून, एखाद्या हॉटेलमध्ये सेवा शुल्क आकारण्यात येत असेल, तर त्या तेथे ग्राहकांनी जाऊ नये. भविष्यात नवे ग्राहक संरक्षण विधेयक मांडण्यात येणार असून, त्यात सेवा शुल्क न आकारण्याबाबतची तरतूद करण्यात येईल. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल.''

"ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या मते सेवा शुल्क आकारणे ही व्यापाराची अयोग्य पद्धत असून, ग्राहकांनी तो देऊ नये. कायद्यानुसार सेवा शुल्काची कोणतीही व्याख्या नाही. सेवा शुल्क आकारणीबाबत हॉटेलांनी मेन्यू कार्डवर माहिती देण्याची गरज असून, बिलावर ही माहिती देऊ नये. मेन्यू कार्डवर सर्व पदार्थांच्या किमतीसह सेवा शुल्काचा उल्लेख असायला हवा, असे पासवान यांनी सांगितले.

Web Title: do not pay service charge, appeals consumer affairs minister paswan