कायद्याशी खेळू नका; सर्वोच्च न्यायालयाची चिदंबरम पुत्राला तंबी

पीटीआय
गुरुवार, 31 जानेवारी 2019

नवी दिल्ली : ""तुम्हाला 10 ते 26 फेब्रुवारीदरम्यान कोठे जायचे आहे तिथे जा, परंतु नंतर मात्र तुम्ही तपास यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य करायलाच हवे, कायद्याशी खेळू नका,'' अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने आज माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना दिली. आयएनएक्‍स मीडिया आणि एअरसेल मॅक्‍सिसप्रकरणी सध्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. आज याच प्रकरणात न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांनी दहा कोटी रुपये जमा केल्यानंतर त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज कार्ती चिदंबरम यांना धारेवर धरले. न्यायालयाच्या आदेशामुळे कार्ती यांना आता 5,6,7 आणि 12 मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जावे लागेल. 

" तुमच्या अशिलास चौकशीला सहकार्य करण्यास सांगा, तुम्ही सहकार्य करणे टाळत आहात. आम्ही खूप काही बोलू शकतो, पण आम्ही आताच मत मांडणार नाहीत,'' असेही खंडपीठाने कार्ती यांच्या वकिलांना खडसावले. तत्पूर्वी सोमवारी झालेल्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयास नेमकी कोणत्या दिवशी कार्ती यांची चौकशी करायची, याची तारीख निश्‍चित करा, असे सांगितले होते. 

टेनिससाठी परदेशात 

न्यायालयाने आजच्या सुनावणी वेळी कार्ती यांना सर्वोच्च न्यायालयातील सचिवांकडे दहा कोटींची थकहमी जमा करण्यास सांगितले, तसेच भारतात परतल्यानंतर चौकशीला सहकार्य करू, अशी हमीही लेखी स्वरूपात घेतली. कार्ती यांनी 10 ते 26 फेब्रुवारी आणि 23 ते 31 मार्चदरम्यान परदेशात जाण्याची परवानगी मागितली आहे. ते आंतरराष्ट्रीय टेनिस टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशात जाणार आहेत. 
 
Web Title: Do not play with the law Supreme Court warns Chidambaram and Their son