'दहशतवाद्यांच्या मृतदेहावर कुटुंबियांचा हक्क नाही'

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

दहशतवाद्यांना मारल्यानंतर यापूर्वी त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबियांकडे दिला जायचा. परंतु, आता दहशतवाद्यांच्या मृतदेहावर त्यांच्या कुटुंबियांचा हक्क राहणार नाही. दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांचा कुटुंबीयांना न सोपवण्याचा निर्णय भारतिय सैन्याने घेतला आहे.

श्रीनगर: दहशतवाद्यांना मारल्यानंतर यापूर्वी त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबियांकडे दिला जायचा. परंतु, आता दहशतवाद्यांच्या मृतदेहावर त्यांच्या कुटुंबियांचा हक्क राहणार नाही. दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांचा कुटुंबीयांना न सोपवण्याचा निर्णय भारतिय सैन्याने घेतला आहे.

दहशतवाद्यांच्या अंतयात्रेवेळी होणारा गोधळ लाक्षात घेऊन भारतीय सैन्याने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी, दहशतवाद्यांना मारल्यानंतर आपल्या देशात गोंधळ निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे मृतदेह हे अज्ञातस्थळी दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. कश्मीरमधील स्थानिक तरुण हे दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होताना यापूर्वी अनेकवेळा निदर्शनास आलेले आहे. त्यातूनच हिंसक गोष्टींना तोंड फुटते. त्यातच तेथील युवकांवरती बंधने घालणेही कठीण होते, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान, बुरहान वानी नावाच्या दहशतवाद्याला भारतीय सैन्याने मारल्यानंतर कश्मीरमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच्या अंत्ययात्रेत अनेक तरुन सहभागी झाले होते. तसेच, त्याच्या अंतयात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.

सोशल मीडियावर अशा व्हिडीओच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी आकर्षित करण्यात येते. लष्कर-ए-तोयबा, हिज्बूल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद आणि अल बद्र यासारख्या दहशतवादी संघटना दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेचा फायदा तरुणांना आकर्षित करण्यासाठी करतात. सोशल मीडियावरुन अंत्ययात्रांचे व्हिडीओ आणि तरुणांना भडकवणारे संदेश जाणीवपूर्वक व्हायरल केले जातात आणि यातून नवे दहशतवादी तयार होतात. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी भारतीय सैन्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Do not rights of their families at the dead body of terrorists