'हुतात्मा जवानांचे चुकीचे फोटो शेअर करू नका'

'हुतात्मा जवानांचे चुकीचे फोटो शेअर करू नका'

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा झाले. त्यानंतर सोशल मीडियातून या हल्ल्याचे चुकीचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोच्या माध्यमातून हुतात्मा जवानांचा अपमान होत आहे. त्यामुळे अशाप्रकारचे पोस्ट किंवा फोटो शेअर करु नये, असे आवाहन सीआरपीएफकडून जनतेला करण्यात आले. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांचे अनेक फोटो बनावट असून, काही समाजकंटकांकडून अशा स्वरुपाचे फोटो व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र व्हायला हवे. अशा स्वरुपाचे पोस्ट किंवा फोटो शेअर करु नका आणि पुढेही पाठवू नका. तसेच त्याला शेअर करु नका किंवा लाईकही करु नका, असे सीआरपीएफकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com