'या' तिन गोष्टी करा आणि मोदींसारखे खोटे बोला

Modi
Modi

नवी दिल्ली - काँग्रसच्या ऑफिशिअर ट्लिटर अकाउंटवरुन नुकतेच एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. येवढेच नाही तर त्यांच्यासारखे खोटे बोलायला शिका अशा ट्रगलाईनसकट तिन स्टेप्सचा क्रॅश कोर्सही दिला आहे. 

हा व्हिडिओ 3.20 मिनिटांचा आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्या भाषणाचे व्हिडिओ वापरण्यात आले आहेत.

पहिल्या स्टेपमध्ये आरशासमोर उभे राहण्यास सांगितले आहे. यानंतर मोदी खोटे कसे बोलतात याचा व्हिडिओ दाखविण्यात आला आहे. 

दुसऱ्या स्टेपमध्ये 15-20 लाख रुपये कसे मिळतील आणि पुढे अमित शहा या निकडणूक जुमला होता असे सांगताना दिसत आहेत. 

एवढ्यावरच क्रॅश कोर्स संपत नसून शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदीच तुम्हाला खोटे कसे बोलावे याचे मार्गदर्शन करणार आहेत. असे सांगत, खोटे बोला पण रेटून बोला असे सांगतानाचा व्हिडिओ जोडण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com