
येथे भरतो नवरदेवाचा बाजार अन् करोडोंमध्ये लागते बोली…
बाजार ही संकल्पना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आठवडी बाजार, भांडयाचा बाजार किंवा इतक कोणतेही. पण तुम्हाला माहिती आहे का? एका ठिकाणी नवरदेवाचांही बाजार भरतो. हो, हे खरंय. बिहारच्या मिथीलांचल भागातील मधुबनी गावात नवरदेवांचाही एक बाजार भरतो. (Do you know abhout grooms market in madhuani bihar)
या मधुबनी जिल्ह्यात सौराठ सभा म्हणजेच नवरदेवांचा बाजार भरतो. जवळपास १३ एकर जमिनीवर हा बाजार भरवला जातो आणि हा बाजार ९ दिवसांपर्यंत चालतो. या बाजारात लांब लांब ठिकाणांहून वर-वधू येतात.
हेही वाचा: भाजपच्या बैठकीपूर्वीच पंतप्रधान मोदी, अमित शहांना धमकी; एका नेत्याला अटक
या विवाहाला स्थानिक भाषेत सभागाछी नावानेही ओळखतात. या बाजारात आपल्या लाडक्या लेकीसाठी बाप उत्तम वराची निवड करण्यासाठी येतात. या लग्नाच्या बाजारात नवरदेव पारंपरिक धोती-कुर्ता आणि पगडी परिधान करुन येतात नंतर वर वधुची पसंती होऊन नोंदणीकाराकडून दस्तावेज लिहुन घेतल्या जातो.
एवढेच नाही, येथे नवरदेवाच्या योग्यतेनुसार किंमतीही लावल्या जातात म्हणजे सौदेबाजी येथे सर्रास चालते. येथे खास करुन ब्राम्हण समुदायातील संबंधित लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याशिवाय या ठिकाणी वर-वधूचे कूळ, गोत्र कुंडली आणि राशीही पाहिली जाते.
हेही वाचा: फोन एकदाच चार्ज करा आणि २ दिवस चालवा... कसे ते पाहा...
या वर्षी ३० जूनपासून हा बाजार भरणार आहे. या बाजारात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन महत्त्वाचे असते. जे स्थळ पसंत पडते, त्याला रजिस्ट्रेशन करणारेच मान्यता देतात. या पुरातन काळापासून चालत आलेल्या नोंदणी पद्धतीमध्ये वडिलांच्या आणि आजोळाच्या ९ पिढ्यांचे संबंध पाहिले जातात. यात कोणत्याही प्रकारचे संबंध आढळल्यास लग्नाला परवानगी मिळत नाही. म्हणजेच काय तर रक्तांच्या नात्यांमध्ये तर लग्न होत नाही ना हे तपासून पाहिले जातं. याचं वैज्ञानिक कारण ते असं देतात की, वेगळ्या ब्लड ग्रुपमध्ये लग्न केल्याने जन्मणारे बाळ हे सुंदर अन् सुदृढ निघते.
हेही वाचा: पुन्हा धोका वाढला! देशात 24 तासांत 18,819 नवे रुग्ण; 39 जणांचा मृत्यू
नोंदणीकार सांगतात की, ही परंपरा ७०० वर्षांपासून सुरू झाली. सन १९७१ मध्ये येथे तब्बल १.५ लाख लोक आले होते. नवरदेवाच्या बाजारासाठी येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था धर्मशाळेत केलेली असते. कोरोना काळात ही परंपरा बंद होती. पण, मागच्यावेळी १० ते १२ हजार लोक येथे आले होते .आणि या नवरदेवाच्या बाजारात ४५० जोडपांचे विवाह झाले होते.
लग्नाबद्दल वेगवेगळ्या समाजांमध्ये वेगवेगळ्या चालीरीती प्रचलित आहेत. परंतु अशा रितीने नवरदेवाचा बाजार भरतो हे खूप लोकांना पहिल्यांदा माहिती झाले असेलं.
हेही वाचा: Girl Burnt Alive: धक्कादायक ! पोलीस बूथ जवळ महिलेला जिवंत जाळल्याची घटना
नेमकी या बाजाराची सुरुवात कशी झाली?
स्थानिकांच्या मते, बहुतांश जुन्या प्रथा-रूढी संपल्या आहेत. हुंड्याची प्रथा नष्ट करण्यासाठी तत्कालीन राजा हरिसिंह देव यांनी या बाजाराची सुरुवात केली होती. तेव्हापासून मग हा बाजार भरतोय आणि या बाजाराची लोकप्रियता अजूनही टिकून आहे हे महत्त्वाचे.
Web Title: Do You Know Abhout Grooms Market In Madhuani Bihar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..