esakal | चरखा ते अशोक चक्र; तिरंग्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

tricolour.jpg

22 जुलै 1947 रोजी आयोजित भारतीय संविधान सभेच्या बैठकीत राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा स्वीकारण्यात आला. मात्र, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून राष्ट्रीय ध्वज मोठ्या बदलांमधून गेला आहे. 

चरखा ते अशोक चक्र; तिरंग्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारत 15 ऑगस्ट रोजी 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावत असतात.  भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंग्यामागे मोठा इतिहास दडला आहे. राष्ट्रीय ध्वजाची कल्पना पिंगली वैंकैयानन्द यांनी केली होती. 22 जुलै 1947 रोजी आयोजित भारतीय संविधान सभेच्या बैठकीत राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा स्वीकारण्यात आला. मात्र, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून राष्ट्रीय ध्वज मोठ्या बदलांमधून गेला आहे. 

पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावून करणार विक्रम!

स्वातंत्र्य चळवळीदरम्यान देशाचा ध्वज शोधण्यात आला. पहिला राष्ट्रीय ध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक कलकत्तामध्ये फडकवण्यात आला होता. हा ध्वज लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या पट्ट्यांचा होता. तेव्हापासून राष्ट्रीय ध्वजाच्या विकासात काही ऐतिहासिक बदल झाले आहेत. 

द्वितीय ध्वज पॅरिसमध्ये मैडम कामा यांच्याकडून 1907 साली फडकावण्यात आला होता. हा ध्वज पहिल्या ध्वजासारखाच होता. फक्त त्यामध्ये वरच्या पट्टीवर एक कमळ आणि सात तारे होते. सात तारे सप्तऋणींना दर्शवत होते. बर्लिनमध्ये झालेल्या समाजवादी परिषदेतही हा ध्वज प्रदर्शित करण्यात आला होता. 

तृतीय ध्वज 1917 मध्ये डॉ. एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी देशांतर्गत शासन आंदोलनादरम्यान फडकविला होता. यात 5 लाल आणि 4 हिरव्या समांतर पट्ट्या आणि सप्तऋषीच्या आकृतीमध्ये त्यावर सात तारे बनलेले होते. वरच्या कोपऱ्यात यूनियन जॅकलाही स्थान देण्यात आले होते. एका कोपऱ्यात पांढरा अर्धचंद्र आणि ताराही होता. 

IAS ते राजकारण; स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या शाह फैझल यांचा आणखी एक धक्का

1921 मध्ये विजयवाडा येथे अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे अधिवेशन झाले होते. येथे आंध्रप्रदेशच्या एका युवकाने महात्मा गांधी यांना झेंडा दिला होता. यात हिंदू आणि मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग होते. भारताच्या उर्वरित समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक पांढरी पट्टी यात असावी असं महात्मा गांधींनी सुचवलं होतं. तसेच राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतिक म्हणून चरखा यात दाखवण्यात आला होता. 

1931 मध्ये तिरंगा ध्वज आपला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यासाठी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ध्वजामध्ये केसरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी गांधीजींचा फिरता चरखा होता.  22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने त्याला स्वंतत्र भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या रुपाने स्वीकारले. यावेळी ध्वजामध्ये फिरत्या चरख्याऐवजी सम्राट अशोकाचे धम्म चक्र दाखविण्यात आले.  काँग्रेस पक्षाचा तिरंगा स्वतंत्र राष्ट्राचा ध्वज म्हणून स्वीकारणात आला.