भ्रष्टाचार बंद हवा की भारत?- मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

कुशीनगर (उत्तर प्रदेश) - भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाने देशाला बरबाद केले, या दोन गोष्टींना रोखण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मोठ्याला मोठा तर छोट्याला छोटा त्रास होईल. लोकांना एवढा त्रास होऊनदेखील त्यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. विरोधी पक्षांना भारत बंद हवा आहे, पण तुम्हाला भ्रष्टाचार बंद हवा की भारत, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला. पूर्वांचलमधील पंतप्रधान मोदी यांची ही दुसरी प्रचारसभा होती.

आम्ही काळ्या पैशांचा रस्ता बंद करू पाहत असताना, विरोधी पक्षाला मात्र भारत बंद व्हावा असे वाटते. याच पक्षांनी 70 वर्षे देशाची लूट केली, आता हीच मंडळी देशाची वेळ आल्यानंतर विरोध करू लागली आहे. संपूर्ण जगामध्ये आता विनापैसे व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जात असून, आम्ही मात्र या स्पर्धेमध्ये पिछाडीवर होतो. आता मात्र आमचा देश कधीच मागे राहणार नाही. मागील सत्तर वर्षांत ज्यांनी लूटमार केली त्यांच्याकडून आम्ही पैसे काढून गरिबांना वीज आणि औषधे देणार आहोत. लोकांनी आम्हाला मदत करावी, देशामध्ये भ्रष्टाचार शिल्लकदेखील राहणार नाही.

आम्ही जनतेचे सेवक
पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या सभेने गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढले. उपस्थितांच्या प्रतिसादाने भारावून गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी एवढी गर्दी माझ्या काशीतील सभेलादेखील झाली नव्हती, असे सांगितले. आमचे सरकार हे दलित, शोषित आणि वंचितांसाठी असून, जनतेचे श्रम हे आमचे श्रम आहेत. लोकांनी माझ्यावर खूप उपकार केले असून, त्याचे ऋण फेडण्यासाठी मी येथे आलो आहे, असे त्यांनी नमूद केले.

ग्रामविकासाला प्राधान्य
गावांचा विकास झाला असता, तर आपला देश कधीच एवढा मागे पडला नसता. उत्तर प्रदेशातील सरकारला जनतेची मुळीच परवा नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचा ऊस कधीच जळू देणार नाही. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 22 हजार कोटी रुपये थकीत असून, त्यांना ही रक्कम मिळावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता साखर कारखान्यांच्या मालकांना नाही, तर शेतकऱ्यांना पॅकेज दिले जाईल, असेही मोदी यांनी नमूद केले.

विद्यमान सरकारने युरियाचा काळा बाजार रोखला. शेतकऱ्यांना आता खतासाठी रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्‍यकता भासत नाही. हेच आमच्या सरकारचे सर्वांत मोठे यश आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: Do you want close India or Corruption?