गांधी हवेत की गोडसे? ः राहुल 

गांधी हवेत की गोडसे? ः राहुल 

नवी दिल्ली ः महात्मा गांधी यांचा भारत हवा, की गोडसेचा भारत हवा? एका बाजूला प्रेम आणि दुसरीकडे द्वेष आहे, असा हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राफेल व्यवहार, रोजगारनिर्मिती आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी निशाणा साधला.

पुलवामामध्ये 40 जवानांना हुतात्मा करणारा बॉंबस्फोट "जैशे महंमद'ने घडवला. पण "56 इंची छातीवाल्यां'च्या आधीच्या सरकारने मसूद अजहरला कंदहारमध्ये सोडले. डोकलाममध्ये सैन्य घुसवून चीनच्या अध्यक्षांनी मोदींमध्ये दम नाही असा स्पष्ट संदेश दिला. तर, मोदींनी चीनमध्ये जाऊन हात जोडून मस्तक टेकले आणि डोकलाम सोडून दिले, अशा शब्दांत राहुल यांनी भाजपच्या "कणखर नेतृत्व' या प्रचाराला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या या पहिल्याच भाषणातून प्रचाराचा बिगुल वाजविताना राहुल गांधींनी दिल्लीतील सातही जागा जिंकण्याचे आवाहन केले. बूथवर कॉंग्रेस, चौकीदार आणि आम आदमीबद्दल बोला, असे आदेश देत त्यांनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपलाच लक्ष्य केले. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाविरुद्ध त्यांनी शब्दानेही टीका केली नाही. 

नरेंद्र मोदींवर "राफेल'वरून टीका करताना राहुल म्हणाले, की मोदींनी कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. परंतु, आता दिल्लीत कोणालाही "चौकीदार' विचारताच "चोर है' असे उत्तर ऐकायला मिळते. देशभरात "चौकीदार चोर है' ही घोषणा पोचली आहे. हे कॉंग्रेसचे कौशल्य आहे. पुलवामातील बॉंबस्फोटाच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनाही राहुल यांनी लक्ष्य केले. 

चीनसमोर मोदी झुकल्याचा हल्ला चढवताना राहुल म्हणाले, की चिनी अध्यक्षांसमवेत मोदींनी अहमदाबादमध्ये झोपाळ्यावर झोके घेतले. त्याचवेळी डोकलाममध्ये चिनी सैन्य शिरले. यानंतर मोदी कोणत्याही कार्यक्रमाशिवाय चीनला गेले. तेथे हात जोडून आणि मस्तक टेकले आणि डोकलाम तुम्ही ठेवा असे सांगून आले. हेच मोदींचे सत्य आहे, असा खळबळजनक आरोपही राहुल गांधींनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com