कृपा करून तुमचे काम करा - राष्ट्रपती

पीटीआय
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - 'धरणे आंदोलन करण्याची संसद ही जागा नव्हे. संसदेचे कामकाज रोखून धरणे म्हणजे बहुमताचा आवाज दपडून टाकण्यासारखे आहे. त्यामुळे कृपा करून तुमचे अपेक्षित काम करा,'' अशी कडक समज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज खासदारांना दिली. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष वारंवार कामकाज बंद पाडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे.

'सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा' या विषयावर एका कार्यक्रमात बोलत असताना राष्ट्रपती मुखर्जी यांनी नोटाबंदीवरून संसदेमधील सध्या सुरू असलेल्या गोंधळाबाबत भूमिका स्पष्ट केली.

खासदारांना उद्देशून ते म्हणाले, 'खासदारांनी जनतेच्या हिताच्या प्रश्‍नांवर चर्चा करून कामकाज करणे अपेक्षित आहे, कामकाज रोखणे नव्हे. संसदीय पद्धतीत अडथळा आणणे पूर्णत: अमान्य आहे. आपल्या समस्यांवर लोकप्रतिनिधींनी बोलावे, यासाठी नागरिकांनी तुम्हाला संसदेमध्ये पाठविले आहे, धरणे आंदोलन करण्यासाठी आणि अडथळे निर्माण करण्यासाठी नव्हे. सतत अडथळे आणणे याचा अर्थ तुम्ही बहुसंख्य नागरिकांचा आवाज दडपून टाकत आहात, त्यांना दुखावत आहात. गोंधळ माजविण्यात बहुसंख्यांचा कधीच सहभाग नसतो.'' केवळ काही जणच संसदेमध्ये गोंधळ निर्माण करत असल्याने अध्यक्षांना कामकाज थांबवावे लागते, हे अमान्य असल्याचे राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले.

'निदर्शने करण्यासाठी तुम्ही इतर जागा निवडा. संसदेमध्ये मात्र कृपा करून तुमचे काम करा. तुम्ही कामकाज पुढे चालविणे अपेक्षित आहे. तुम्हाला लोककल्याणासाठी दिलेल्या अधिकारांचा योगय वापर करणेच तुमच्याकडून अपेक्षित आहे,'' असेही मुखर्जी म्हणाले. कोणतेही मतभेद असतील तरी चर्चा करण्याचा तुमचा मार्ग मोकळा आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, आपला रोख कोणत्याही एका पक्षाकडे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Do your work please - President