
CJI Chandrachud : मला कायदामंत्र्यांशी वाद घालायचा नाही; चंद्रचूड यांचं विधान
नवी दिल्ली : न्यायाधीशांची नेमणूक करणाऱ्या कॉलेजियम प्रणालीचा बचाव करताना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, प्रत्येक यंत्रणा परिपूर्ण नसते, मात्र सध्या तरी उपलब्ध प्रणाली सर्वोत्तम प्रणाली आहे. तसेच न्यायपालिका स्वतंत्र ठेवण्यासाठी बाह्य प्रभावांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं.
चंद्रचूड म्हणाले, "प्रत्येक प्रणाली परिपूर्ण नसते परंतु आम्ही विकसित केलेली ही सर्वोत्तम प्रणाली आहे. पण मुख्य मूल्य असलेल्या न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हा या प्रणालीमागचा हेतू होता. न्यायपालिकेला स्वतंत्र ठेवायचे असेल तर न्यायव्यवस्थेला बाह्य प्रभावांपासून वेगळे ठेवावे लागेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने घटनात्मक न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून कायदामंत्री किरण रिजिजू यांना शिफारस केलेल्या नावांना सरकारने मान्यता न दिल्याबद्दल सरकारने सांगितलेल्या कारणांवरून सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान 'आकलनात फरक असायला काय हरकत आहे? परंतु, मजबूत घटनात्मक राजकारणाच्या भावनेतून मला अशा मतभेदांना सामोरे जावे लागते. मला कायदामंत्र्यांशी या मुद्द्यांवरून वाद घालायचा नाही. मतभिन्नता असू शकते, असंही ते म्हणाले.
काही न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता न देण्याच्या प्रश्नावर कायदामंत्री किरण रिजिजू म्हणाले होते की, आपण या वादात पडू इच्छित नाही. ते म्हणाले की, सरकारने मान्यता न दिलेल्या लोकांना न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावामागे काही ना काही कारण होते. तसेच सरकारने हे प्रस्ताव का थांबवले याची माहिती कॉलेजियमला आहे, असे ते म्हणाले.