
माणसानं कुत्र्यांवर अत्याचार केल्याची दोन प्रकरणं आठवडाभरात उघडकीस आली आहेत.
Crime News : घराच्या अंगणात कुत्र्यावर केला अत्याचार; शेजाऱ्यानं बनवला Video अन् समोर आली धक्कादायक बाब..
दिल्लीच्या इंद्रपुरीत (Delhi Indrapuri) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका कुत्र्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजधानीत आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. आरोपीच्या शेजाऱ्यानं या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पोलिसांत तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली.
तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहिता (IPC) कलम 377 (अनैसर्गिक कृत्य) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, '28 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा घरी परतले असता त्यांना आरोपीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. त्यांनी पाहिलं की आरोपी कुत्र्याचं (Dog) त्याच्या घराच्या अंगणात लैंगिक शोषण करत आहे.'
तक्रारदारानं या घटनेची माहिती पीपल फॉर अॅनिमल्सच्या सदस्या सुरभी रावत यांना दिली. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, अशाच एका प्रकरणात गेल्या आठवड्यात दिल्लीतील हरीनगर येथील एका उद्यानात कुत्र्याचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका मजुराला अटक करण्यात आली होती. त्या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

Dog Abuse in Delhi