गॅस सिलिंडरबद्दल सरकारचा नवा प्लॅन; सबसिडी मिळणार की बंद होणार?

LPG Gas Cylinder Subsidy: सरकार सर्व ग्राहकांना सबसिडीशिवाय सिलिंडर पुरवठा करु शकते किंवा सरसरकट सबसिडी न देता निवडक ग्राहकांना सबडीचा लाभ दिला जाऊ शकतो.
lpg gas subsidy
lpg gas subsidyEsakal

एलपीजी गॅस सिलिंडर सबसिडी (LPG Gas Cylinder Subsidy):

एलपीजी (LPG) किंमती सातत्याने वाढत आहेत. या किंमती आता जवळपास १००० च्या आसपास पोहोचल्या आहेत. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सातत्याने विरोधक केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्ट मत मांडलं नसलं तरी, केंद्र सरकारच्या (Central Government) अंतर्गत मूल्यांकनात ग्राहक एका सिलेंडरसाठी (Per Cylinder Price) 1000 रुपये देण्यास तयार असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे सरकार एलपीजी सिलिंडरवर दिल्या जाणाऱ्या सबसिडीबाबत वेगळा प्लॅन करत असल्याचं कळत आहे.

lpg gas subsidy
इंडेन एलपीजी कनेक्शन एका Miss Call वर; इंडियन ऑइलची सुविधा

एलपीजी गॅस सिलिंडर सबसिडीबाबत केंद्र सरकारची भूमिका (Role of Central Government regarding LPG Gas Cylinder Subsidy:):

एलपीजी सिलेंडर बाबतीत सरकार दोन पद्धतीने विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सरकार सर्व ग्राहकांना सबसिडीशिवाय (Subsidy to all) सिलिंडर पुरवठा करु शकते किंवा सरसरकट सबसिडी न देता निवडक ग्राहकांना सबडीचा लाभ दिला जाऊ शकतो. आता पर्यंत केंद्र सरकारच्या या भूमिकेत अजून काहीही स्पष्टता नाही. परंतु १० लाख रुपये उत्पन्नाचा नियम लागू राहणार असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडीचा लाब मिळणार असल्याचं कळतंय.

lpg gas subsidy
गॅस सिलिंडर एक हजार रुपयांना होणार;पाहा व्हिडिओ

एलपीजी गॅस सिलिंडर सबसिडीबाबत सद्यस्थिती (Current Status LPG Gas Cylinder Subsidy):

मे २०२० पासून अनेक ठिकाणी एलपीजीवरील सबसिडी बंद आहे. परंतु अजूनही सबसिडी पुर्णपणे बंद नाही. 2015 मध्ये DBTL योजनेअंतर्गत ग्राहकांना संपुर्ण रक्कम देऊन गॅस सिलिंडर खरेदी करावा लागतो. सबसिडीचे पैसे सरकारकडून ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

अलीकडेच 1 सप्टेंबर रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. सध्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 884.5, मुंबईत 884.50 आणि चेन्नईमध्ये 900.50 रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com