मला मुख्यमंत्री व्हायचे नाही - शिवपाल यादव

वृत्तसंस्था
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

समाजवादी पक्षाला (सप) 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवपाल यादव यांनी आपली व्यथा मांडली. या कार्यक्रमाला समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव, शरद यादव आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

लखनौ - काही जणांना नशिबाने पदे मिळतात, तर काही जणांना काम करुनही काही मिळत नाही. पक्षासाठी मी माझे रक्त देण्यासाठीही तयार आहे. मला कधीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हायचे नाही, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे (सप) नेते शिवपाल यादव यांनी दिली आहे.

समाजवादी पक्षाला (सप) 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवपाल यादव यांनी आपली व्यथा मांडली. या कार्यक्रमाला समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव, शरद यादव आदी प्रमुख नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यातील वाद जुनाच असून, यादव कुटुंबातील कलह सर्वांसमोर आला होता. 

शिवपाल म्हणाले, की मी नेताजींचा अपमान सहन करू शकत नाही. मी आतापर्यंत माझी जबाबदारी योग्यरित्या संभाळली आहे. पक्षात बंडखोर नेत्यांची संख्या अधिक असून, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही माझा कितीही अपमान करा, मी चांगले काम केलेले आहे.

Web Title: Don’t Want to Be UP CM says Shivpal Yadav