दत्तक घेतलेल्या डोणजा गावासाठी सचिनने दिले 4 कोटी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजा हे गाव संसद आदर्श गाव योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे. यापूर्वी त्याने आंध्रप्रदेशमधील पुत्तमराजू कंद्रिगा हे गाव दत्तक घेतले आहे. खासदारांसाठी असलेल्या निधीतून सचिननने डोणजा गावाच्या विकासासाठी 4 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सचिनने दिलेल्या निधीतून गावातील विकासाची विविध कामे पूर्ण होणार आहेत. गावातील शाळेची इमारत बांधणी, पाणीपुरवठा योजना, चांगले रस्ते, सांडपाण्याचा मार्ग आदी कामे होणार आहेत. याबाबत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. गावात असलेल्या 70 वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीच्या जागी नवी इमारत बांधण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनेमुळे गावातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोचणार आहे. सचिनने हे गाव दत्तक घेतल्यापासून ग्रामस्तरावरील पाच विशेष बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत गावातील महिलांचाही सहभाग होता. गावातील विकासकामांचे नियोजन पूर्ण झाले असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्या संदर्भातील कंत्राटे काढण्यात येणार आहेत.

याबाबत माहिती देताना उस्मानाबादचे सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, 'सामाजिक-आर्थिक रचना लक्षात घेऊन गावाचा सर्वप्रकारे विकास करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गावकऱ्यांसोबत काम करत आहे. क्रिकेटमधील महान खेळाडू आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांनी हे गाव दत्तक घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.'

ज्यावेळी सचिनने हे गाव दत्तक घेतले त्यावेळी गावातील 610 घरांपैकी 400 पेक्षा अधिक घरांमध्ये शौचालय नव्हते. गाव दत्तक घेतल्यानंतर गावात 231 शौचालये उभारण्यात आली असून ती वापरली जात आहेत.

Web Title: Donja village adopted by Sachin Tendulkar