अॅडमिट कार्डवर उमेदवाराऐवजी चक्क गाढवाचा फोटो !

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

जम्मू आणि काश्मीरच्या सेवा निवड बोर्डाअंतर्गत तहसीलदार पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा रविवारी होणार आहे. त्या परीक्षेसाठी या अॅडमिट कार्डही संबंधित उमेदवारांना दिले जात आहे. त्यातील एका अॅडमिट कार्डवर चक्का गाढवाचे नाव आणि फोटो छापण्यात आला आहे.

नवी दिल्ली : 'जम्मू आणि काश्मीर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड' परीक्षेच्या अडमिट कार्डवर उमेदवार म्हणून कचुर खार (ब्राऊन गाढव) नाव देण्यात आले. इतकेच नाहीतर उमेदवाराऐवजी चक्क गाढवाचा फोटो देण्यात आला. ही परीक्षा नायब तहसीलदार पदासाठी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या या ओळखपत्रावर गाढवाचा फोटो देण्यात आला आहे. 
 
जम्मू आणि काश्मीरच्या सेवा निवड बोर्डाअंतर्गत तहसीलदार पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा रविवारी होणार आहे. त्या परीक्षेसाठी या अॅडमिट कार्डही संबंधित उमेदवारांना दिले जात आहे. त्यातील एका अॅडमिट कार्डवर चक्का गाढवाचे नाव आणि फोटो छापण्यात आला आहे. सोशल मीडियावर याबाबतचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याबाबत चर्चा केली आहे. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या अॅडमिट कार्डवर प्राण्याचा फोटो देण्यात आल्याने सगळीकडे एकच चर्चा आहे. दरम्यान, तहसीलदार पदाच्या परीक्षेतच असे झाल्याने सगळीकडे एकच चर्चा आहे. 

याबाबतचे वृत्त ट्विटवर प्रसिद्ध झाल्याने अनेक नेटिझन्सने यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. बोर्ड आणि कमिशनच्या स्थितीचे एक उदाहरण आहे. आता गाढव परीक्षेला बसणार का, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर प्रसिद्ध झाल्या आहेत.  

Web Title: Donkey Gets Admit Card But Will It Appear For Exam