मोदीजी, नेहरुंचा वारसा पुसू नका; मनमोहनसिंगांचे पत्र

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

यापूर्वी तीन मूर्तीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न कोणत्याच सरकारने केला नाही, पण त्यात बदल करणे हा या सरकारचा अजेंडा आहे. त्यात जर बदल केले गेले, तर त्याला महत्त्व राहणार नाही. असे मत काँग्रेसने व्यक्त केले.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीतील नेहरू यांच्या 'तीन मूर्ती' या निवासस्थानात पंतप्रधान मोदी यांनी सर्व पंतप्रधानांसाठी एक संग्रहालय करण्याचा विचार मांडला होता. याला काँग्रेसने विरोध केला. 

तीन मूर्ती हे नेहरू यांचे निवासस्थान होते, त्यानंतर ते वारसास्थळ म्हणून जतन करण्यात आले. त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे, त्यामुळे त्यात कोणतेही बदल केले जाऊ नयेत अशा मागणीचे पत्र मनमोहन यांनी मोदींना लिहिले आहे. 'मोदी हे पंडित नेहरूंचा वारसा व योगदान नष्ट करायचा प्रयत्न करत आहेत. नेहरू हे फक्त काँग्रेसचे नसून सर्व देशाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या वारसास्थळाशी कोणतीही छेडछाड केली जाऊ नये.' असेही मत या पत्रात मांडण्यात आले आहेत. 

यापूर्वी तीन मूर्तीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न कोणत्याच सरकारने केला नाही, पण त्यात बदल करणे हा या सरकारचा अजेंडा आहे. त्यात जर बदल केले गेले, तर त्याला महत्त्व राहणार नाही. असे मत काँग्रेसने व्यक्त केले. 'तीन मूर्ती ही वास्तू देशाचे पहिले पंतप्रधान व भारताच्या प्रमुख वास्तुकारांना समर्पित आहे, त्यामुळे या वास्तूत फेरफार करणे योग्य नाही.' असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: dont change neharus teen murti memorial said manmohan singh