सरकारी नोकऱ्यांच्या मागे लागु नका, पानटपरी टाका - देव

वृत्तसंस्था
रविवार, 29 एप्रिल 2018

"शिक्षित भागातील युवकांनी नेत्यांच्या पाठीमागे लागून सरकारी नोकऱ्यांच्या मागे लागू नये. त्यांनी 'पानटपरी' टाकून स्वयंरोजगारी बनावे" असे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी शनिवारी सकाळी सरकारी नोकऱ्यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले.

नवी दिल्ली - "शिक्षित भागातील युवकांनी नेत्यांच्या पाठीमागे लागून सरकारी नोकऱ्यांच्या मागे लागू नये. त्यांनी 'पानटपरी' टाकून स्वयंरोजगारी बनावे" असे  वादग्रस्त वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी शनिवारी सकाळी सरकारी नोकऱ्यांच्या संदर्भात केले.

मुख्यमंत्री देव यांच्या मते, अनेक युवक सरकारी नोकऱ्यांच्या मागे लागून त्यामध्ये आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण वेळ वाया घालवतात. त्यांनी जर पानटपरी टाकून ती चालवली असती तर, त्यांच्याकडे किमान पाच लाख रुपये त्यांच्या बचत खात्यात शिल्लक जमा असते. यावेळी मुख्यमंत्री देव यांनी मोदींच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची देखील आठवण करुन दिली. त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत अशा उद्योगांसांठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. 

मु्ख्यमंत्री देव यांच्या वक्तव्यावर टीका झाल्यावर मात्र त्यांच्याकडून यावर खेद व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी मात्र यावर सडकून टीका केली आहे, या वक्तव्याने नरेंद्र मोदी यांच्या 'पकोडा' वक्तव्याची आठवण करुन दिल्याचे विरोधकांनी सांगितले. मुख्यमंत्री देव यांनी याआधीही अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. 

Web Title: Dont chase government jobs, set up paan shops says biplab dev