नरेंद्र मोदी सरकारला सहकार्य करू नका

यूएनआय
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातील आपल्या लढाईला एका नव्या उंचीवर नेताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शासकीय कर्मचारी-अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना असहकार्याचे धोरण स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती किंवा दहशतवादी हिंसाचाराच्या मुद्यावरही केंद्र सरकारला कोणतेही माहिती पुरवू नका, अशा सूचना ममता यांनी दिल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, कोलकता येथील मुख्यमंत्री कार्यालयाने यासंबंधीची सूचना जारी केली आहे. तातडीच्या प्रकरणांमध्ये ममता यांचे कार्यालय किंवा मुख्य सचिवांच्या कार्यालयामार्फतच माहिती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारची सूचना जारी करण्याची ही पहिली वेळ नाही. 2013 मध्येही यूपीए सरकारच्या काळात अशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. जिल्हानिहाय गुन्ह्यांच्या नोंदी गृहमंत्रालयाला पुरविण्यापासून रोखण्यात आले होते, असे एका सूत्राने सांगितले.

Web Title: Don't cooperate with Modi govt