पतीच्या पोटगीवर परजीवी म्हणून उपजीविका व्यर्थ

पीटीआय
सोमवार, 27 मार्च 2017

पतीपासून फारकत घेतलेली पत्नी शिक्षित असेल, तर तिने केवळ पतीकडून मिळणाऱ्या पोटगीवर अवलंबून न राहता स्वतःही काम करावे, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्लीतील न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली - पतीपासून फारकत घेतलेली पत्नी शिक्षित असेल, तर तिने केवळ पतीकडून मिळणाऱ्या पोटगीवर अवलंबून न राहता स्वतःही काम करावे, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्लीतील न्यायालयाने दिला आहे.

पोटगीची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी एका महिलेने न्यायालयाकडे केली होती. याविषयी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सदर महिलेची कानउघाडणी करत ही रक्कम वाढवून देण्यास स्पष्टपणे नकार दर्शविला. स्वतः पतीपेक्षा अधिक शिक्षण घेतलेले असताना घरी बसून केवळ पतीच्या पोटगीवर उपजीविका करणे, हे अपेक्षित नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के. त्रिपाठी यांनी स्पष्ट करत तिची मागणी फेटाळून लावली.

सदर महिलेला पतीपासून फारकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार दरमहा 5500 रुपये पोटगी मिळत होती. आता तिने दरमहा 25 हजार रुपये मिळावेत, अशी मागणी केली. मात्र, स्वतःचा खर्च कसा वाढला, याचा तपशील न्यायालयात सादर करण्यात तिला अपयश आले.

Web Title: Don't depend on husbunds alimony