'Don’t Forget Kashmir' संदेश देत भारताला 'अल् कायदा'चा इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

- अल् जवाहिरीने दहशतवाद्यांना संबोधले जिहादी.

- संदेशात केली पाकिस्तानवरही टीका. 

इस्लामाबाद : ओसामा बिन लादेनच्या 'अल् कायदा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल् जवाहिरीने भारताला इशारा दिला आहे. त्याने 'Don’t Forget Kashmir' संदेश देत भारताला इशारा दिला आहे. तसेच त्याने दहशतवादी कृत्यांचे समर्थनही केले आहे. 

अल् जवाहिरीने काश्मीरमध्ये दहशतवाद भडकावणारा संदेश जारी केला असून, त्यामध्ये त्याने ‘Don’t Forget Kashmir’ (काश्मीरला विसरू नका) असा संदेश दिला आहे. याबाबतचा व्हिडिओ अल् कायदाच्या मीडिया शाखेने जारी केला असून, या संदेशात दहशतवादी मुसाचेही छायाचित्र लावण्यात आले आहे. या संदेशाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांसमोर येऊन त्यांना समर्थन देणे आणि त्यांचे समर्थन घेणे हा त्यामागील अल् जवाहिरीचा हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे. 

दरम्यान, अल् जवाहिरीने दहशतवाद्यांना जिहादी असे संबोधले आहे. तसेच त्याने जारी केलेल्या संदेशात पाकिस्तानवरही टीका केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont Forget Kashmir Al Qaeda Chief Al Jawahiri threaten to India